पुणे शहरात बारामती लोकसभा मतदारसंघातील काही भाग येतो. या भागातील पाणी, रस्ते, कचरा प्रकल्प या कामांना अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर असताना गती देण्याचं काम केले होतं. मात्र सत्ता गेल्यानंतर या सर्व कामांना स्टे देण्याचे काम करण्यात आलं आहे. त्यामुळे या सर्व कामासाठी महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून होत नाही. आता यापुढे आमची काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.