“देशभरातील विरोधकांवर तसेच जी लोक सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशा कारवाई होत आहे. अशा कारवायांना आम्ही घाबरत नाही आणि घाबरण्याची गरजही नाही, कारण सरकारला आमची भीती वाटते. आम्ही सगळे ‘इंसाफ के सिपाई’ म्हणून आम्ही लढत आहोत. असे प्रकार आता देशभरात सुरू आहेत. त्यामुळे देशात राजकीय स्वातंत्र आणि लोकशाही जिवंत आहे का? असा प्रश्न पडतो”, अशी टीका आदित्य ठाकरे साई रिसॉर्ट प्रकरणी कारवाईवरून केली. तसेच '२०२४ ची निवडणूक ही या देशातील शेवटची निवडणूक ठरेल' असेही ते म्हणाले