Pune: जुना पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटने टोल हटावची मागणी!; तळेगावात कडकडीत बंद

2023-03-09 21

जुना पुणे- मुंबई महामार्गावरील सोमाटना टोल नाका हटवण्यासाठी मावळकर आक्रमक झाले आहेत. सोमाटने टोल नाका हटाव कृती समिती अधिक आक्रमक झाली असून आज 'तळेगाव बंद'ची हाक त्यांनी दिली होती. अत्यावश्यक सेवा देणारे दुकाने वगळता सर्व दुकाने बंद असून तळेगावकरांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.