नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे चर्चांणा उधाण आलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका मांडल्यावर खासदार संजर राऊतांनी देखील यावर भाष्य केलं आहे. नागालँडमध्ये असा प्रयोग पहिल्यांदाच झालाय असं नाही. याआधीही नागालँडमध्ये अशा प्रकारचं एकत्रित सरकार बनवण्याचा प्रयोग झाला आहे. कारण ती त्या राज्याची गरज आहे, असं संजय राऊत म्हणाले.