महिला दिनानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिने हजेरी लावली होती. यावेळी तिच्या नृत्यावर महिलाही थिरकल्याच पाहायला मिळालं. त्यानंतर तिने माध्यमांशी संवाद साधला. मला जे चांगलं म्हणतात त्यांना मी
धन्यवाद करते आणि जे मला चांगलं म्हणत नाही त्यांना बाय बाय, असं म्हणत तिने टीकाकारांना उत्तर दिलं आहे.