उद्धव ठाकरेंच्या खेडमध्ये झालेल्या सभेवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सभेत राष्ट्रवादीची लोकं होती अशी टीका केली जात आहे. यावर राऊत यांनी उत्तर देत ठाकरेंच्या शिवसेनेवर अजूनही अशी वेळ आलेली नाही. तर कालच्या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले असा टोलाही त्यांनी शिंदे आणि भाजपाला लगवाला.