माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज खेड येथे सभा होत असताना या सभेवरून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली आहे. 'राजकीय पक्षांच्या सभा होतच राहणार ते पक्षाचे नेते आहेत, सभा घेणार वेगळं काय त्याच्यामध्ये? आनंद एवढाच आहे की ते घरा बाहेर पडले आहेत. फेसबुक वरती ते सभा घेत नाहीत, आता थेट घेत आहेत लोकांना तो एक बदल दिसत आहेत' अशी खोचक टीका विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर केली.