Navneet-Ravi Rana Dance: राणा दांपत्याची आदिवासी बांधवांसोबत होळी; पारंपरिक नृत्य करत सण साजरा
नवनीत राणा यांना लोकसभेमध्ये सर्वात जास्त मते अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील आदिवासी भागातून मिळाली. गेल्या बारा वर्षांपासून खासदार नवनीत राणा व रवी राणा हे होळीचा सण आदिवासी बांधवांसोबत साजरा करत असतात आदिवासी बांधवांसाठी होळी हा सगळ्यात महत्वाचा सण असतो. राणा दांपत्य होळीसाठी तब्बल पाच ते सात दिवस मेळघाटातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरा करतात. यावर्षी देखील होळीसाठी आदिवासी भागात गेले असून नवनीत राणा यांनी मेळघाटातील महिलांसोबत आदिवासी गादली नृत्यावर ताल धरला, तर आमदार रवी राणा यांनी ढोलकी वाजून सहभाग घेतला.