Sanjay Raut: 'विधीमंडळाबाबत "चोरमंडळ" हा शब्द...'; ‘चोरमंडळ’ विधानावर संजय राऊतांचे स्पष्टीकरण

2023-03-04 1

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. विधानसभेतही यावरून मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. भाजपाच्या अनेक सदस्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही आणला. दरम्यान, या विधानावर आता संजय राऊत यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

Videos similaires