उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवगर्जना मेळावा साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कलामंदीरात झाला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शिंदे सरकारसह भाजप, मोदी, शहांसह पालकमंत्री शंभूराज देसाईवर टीकेची झोड उठवली. दरम्यान, राऊत यांनी सांगली येथील भाषणात निवडणूक आयोगाला जी शिवी दिली त्याचे समर्थन साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात करत ज्याची जशी लायकी तशी भाषा मी वापरली त्याबद्दल मी माफी मागणार नाही. 50 खोके एकदम ओके ही देशातील एक लोकप्रिय शिवी झाली आहे, असं राऊत म्हणाले. तसंच साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे पाटणचे पाप्याचे पितर असल्याचे खोचक टीका केली.
#SanjayRaut #ShambhurajDesai #Satara #Shivsena #Politics #Patan #ModiGovernment #Shivgarjana #Shivsanvad #EknathShinde #UddhavThackeray #MahavikasAghadi