Devendra Fadnavis: लोकसत्ता जिल्हा निर्देशांक सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य

2023-03-04 1

देशाच्या सर्वांगीण प्रगतीत अत्यंत मोलाचा वाटा असणाऱ्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या कामगिरीचे मोजमाप करणारा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ सिद्ध झाला. यानिमित्त मुंबईतल्या सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा निर्देशांक काल (४ मार्च) प्रसिद्ध झाला . यावेळी फडणवीसांनी आपले मनोगत व्यक्त करताना 'पुढचं आयटी कॅपिटल हे नवी मुंबई असणार असे वक्तव्य केले. 'आपण ट्रान्सहार्बर लिंक तयार करतो आहोत. पुढचं आय टी कॅपिटल हे नवी मुंबई असेल. मेट्रोचे प्रकल्प, कोस्टल रोड या पायाभूत सुविधा आहेत. महाराष्ट्राचा जो विकास झाला त्यामध्ये जेएनपीटी बंदराचं महत्त्व वेगळं आहे' असे विधान करत त्यांनी पुढील विकासाचा आराखडा सांगितला.