राज्यात बारावी बोर्डाची परीक्षा सुरू आहे. असं असतानाच सिंदखेडराजा येथील एका शाळेत बारावी गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा आहे. मात्र हा पेपर फुटला हे आताच म्हणता येणार नाही. या पेपरमधील दोन पाने व्हायरल झाली आहेत. ती कुठून, कशी आणि कोणत्या उद्देशाने करण्यात आली. त्याबाबतचा तपास पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि माध्यमिक शिक्षण मंडळाचे
अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.