Kasba Bypoll Results: कसब्यातील पिछाडीवर Sudhir Mungantiwar यांची प्रतिक्रिया

2023-03-02 1

कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांनी मागे टाकत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार तथा वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका निवडणुकीत आम्ही जिंकतोय तर एका निवडणुकीत आम्ही मागे आहोत. कभी खुशी कभी गम असा निकाल जनतेने दिला आहे, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी चिंचवडच्या मतदारांचे आभार मानले तर कसब्यात कुठे कमी पडलो याचं चिंतन होईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.

Videos similaires