भाजपाचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उध्वस्त करू, ही तर परिवर्तनाची नांदी आहे, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी कसब्यातील निकालाचं स्वागत केलं आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या पाठिंब्यानं भाजपा जिंकत आली आहे. आता महाराष्ट्र, दिल्ली आणि फडणीवसांना कळलं असेल की खरी शिवसेना कुठे आहे, असा टोलाही राऊतांनी लगावला. तर पुढल्यावेळी चिंचवडही जिंकू, असा निर्धार त्यांनी केला.