कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. तर भाजपाचे उमेदवार हेमंत रासने पिछाडीवर आहेत. या सगळ्यावर स्वतः रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आहेत. जे काय उत्तर आहे ते पेटीत दिसलं आहे, त्यामुळे धंगेकर कोण आहे हे आता कळलं असेल, असं म्हणत त्यांनी भाजपाला डिवचलं आहे.