महाराष्ट्रात देवीची साडे तीन शक्तिपीठे मानली जातात. कोल्हापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता l मातुः पुरुं द्वितीयंच रेणुकाधिष्ठितम् l तुळजापूर तृतीयं स्यात् सप्तशृंग तथैवच ॥ या वर्णनाप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ व आद्य शक्तिपीठ आहे दुसरे माहूरची रेणुका माता, तिसरे पीठ तुळजापूरची तुळजाभवानी तर सप्तशृंगीची देवी हे अर्धपीठ म्हणून ओळखली जाते.