विधीमंडळ हे चोरमंडळ आहे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गट आणि भाजपावर निशाणा साधताना केलं असून याच वक्तव्यावरुन अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. यावर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया देताना 'कितीही हक्कभंग आणले तरी संजय राऊत घाबरत नाही' अशी प्रतिक्रिया दिली.