राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या दुसर्या दिवशी कांदा आणि कापसाचा मुद्दा लावून धरल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी वीजेच्या आणि गॅस दरवाढ प्रश्नावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावेळी 'शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करा' आणि शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज द्या नाही तर खुर्च्या खाली करा' अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी निदर्शने केली.