Devendra Fadnavis on Raut: 'हा सभागृहाचा घोर अपमान आहे'; राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची नाराजी

2023-03-01 11

संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध करताना राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी 'संपूर्ण विधानमंडळाला चोरमंडळ म्हणणे हे कुठल्याही स्थितीत सहन केले जाऊ शकत नाही. असे प्रकार जर आपण सहन करणार असू, तर ते गंभीर ठरेल. उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?' असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 'महाराष्ट्र विधानमंडळाची अतिशय थोर परंपरा आहे. देशातील सर्वोत्कृष्ट विधानमंडळ हे महाराष्ट्राचे आहे. हा विरोधी वा सत्ताधारी पक्षाचा प्रश्न नाही. हे सहन केले तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील. सर्वोच्च सभागृहाचा हा घोर अपमान आहे' असे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

Videos similaires