'महाराष्ट्रात नवीन गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दावोसचा दौरा केला. तेथून राज्यासाठी एक लाख ३७ कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा ते करीत आहेत. मात्र त्यांनी सांगितलेल्या यादीत अनेक कंपन्या आपल्याच देशातील आणि राज्यातील आहेत. त्या कंपन्याच्या प्रतिनिधींना येथेच बोलवून घ्यायचे होते. या कंपन्यासाठी दावोसला जाण्याची गरजच काय?' असा परखड सवाल विरोधीपक्षनेते अजित पवारांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.