पुण्यातील फ्लेक्सबाजीचं लोण आता थेट पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरी- चिंचवड शहरात येऊन पोहचलं आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा अशा आशयाचे फलक लागले आहेत. चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल येण्यासाठी अजून एक दिवस बाकी आहे. असं असताना शहरात लागलेल्या या फ्लेक्सने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.