पत्रकार वारिसे हत्याप्रकरणी 'एसआयटी'वर दबाव नसावा. या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करावा. राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. या तपासात कसलाही दबाव आणला जाणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पत्रकार वारिसे प्रकरणात अतिशय गांभीर्याने कारवाई सुरू आहे. १६ अधिकाऱ्यांचा चमू त्यावर काम करते आहे. सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही!
या पत्रकाराच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे' असे विधान फडणवीसांनी केले.