अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सरोज अहिरे यांनी विधानभवनात हिरकणी कक्षाच्या व्यवस्थेची मागणा केली होती. मात्र आपल्या लहान बाळासाठी कुठलीही सोय नसल्याची तक्रार सरोज अहिर यांनी केली आहे. या मुद्द्यावर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. बाल संगोपन कक्षाची पाहणी करून विधीमंडळ अधिकाऱ्यांना याबाबत सुचना केल्या आहेत. तर या बाबतीत ज्यांच्याकडुन हलगर्जीपणा झाला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं त्या म्हणाल्या.