महाराष्ट्रात कांदा प्रश्न पेटला असून त्याचे पडसाद राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात कांदा घेऊन आंदोलन केलं. काद्यांला भाव मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ देखील उपस्थित होते.