Chinchwad Byelection: अश्विनी जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क; लक्ष्मण जगतापांच्या आठवणीने भावुक
कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे. चिंचवड मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप या निवडणूक रिंगणात आहेत. अश्विनी जगताप यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी एक लाख मतांनी आपला विजय होईल, असा विश्वास देखील व्यक्त केला. दरम्यान, गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीनिमित्त राज्यातील राजकीय वातावरण तापलं होतं. यावेळी भाजपा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे.