धंगेकरांचं उपोषण हे आचारसंहितेचं उल्लंघन; Devendra Fadnavis यांनी मविआला घेरलं
मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर पैसे वाटपाचा आरोप करत उपोषण पुकारलं होतं. धंगेकरांचे हे आरोप भाजपाकडून खोडून काढले जात आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाने असा कोणताही गैरप्रकार केला नाही, असं स्पष्ट केलं आहे. या पाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. धंगेकरांची ही राजकीय स्टंटबाजी आहे. प्रचार थांबला असतानाही आंदोलन करून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.