Ajit Pawar यांच्या टीकेला Narayan Rane यांचं जोरदार प्रत्युत्तर
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचा संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं विधान केलं होतं. त्याचा व्हिडीओ देखील बराच व्हायरल होत आहे. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया देत अजित पवारांना थेट इशारा दिला आहे. अजित पवारांनी बारामतीच्या बाहेर इतरांचे बारसे घालायला जाऊ नये. माझ्या फंद्यात पडू नका नाहीतर पुण्यात येऊन बारा वाजवीन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे.