शिंदेंचा रिमोट अमित शाह आणि फडणवीसांच्या हातात Imtiyaz Jaleel यांची टीका
एमआयएमचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन नवी मुंबईमध्ये पार पडलं. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधला आहे. दोन्ही सेनेमध्ये गट पडले आहेत, या प्रश्नावर त्यांनी दोन कशाला चार गट तयार करावे, अशी माझी प्रार्थना असल्याचं म्हटलं. तसंच हे सरकार आपल्या खुर्चीच्या लालसेपोटी मराठी माणसावर अन्याय करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.