Karuna Sharma यांचा रुपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल, न्याय न मिळाल्याची खंत व्यक्त

2023-02-23 1

करुणा शर्मा यांनी पुन्हा एकदा आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत. वारंवार महिला आयोगाकडे तक्रार करून देखील न्याय न मिळाल्याची खंत करुणा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा उल्लेख करत जोरदार टोला देखील लगावला. तसंच धनंजय मुंडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी देखील करुणा शर्मा यांनी केली आहे.