चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. भाजपाकडून बड्या नेत्यांना प्रचारात उतरवण्यात आलं आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रोड शोमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.