मंगळवारी पाटण्यात बिहार सरकारच्यावतीने शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीशकुमार इंग्रजीत बोलणाऱ्या शेतकऱ्यावर चांगलंच संतापल्याचं बघायला मिळालं. ”हे इंग्लंड नाही तर भारत आहे, हिंदीत बोला”, असं म्हणत त्यांनी भरसभेत शेतकऱ्याला सुनावलं. या व्हिडीओची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा आहे.