पक्षाच्या जुन्या शाखेसंदर्भात Rajan Vichare यांनी पोलीस आयुक्तांकडे केली 'ही' मागणी

2023-02-22 1

शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी पक्षाच्या अधिकृत कार्यालयांवर हक्का सांगितला आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ठाण्यातील जुन्या शाखा शिंदे गटाकडून बळकावल्या जात असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी राजन विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी याची दक्षता घ्यावी, अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Videos similaires