सर्वोच्च न्यायालय हा शेवटचा किरण - Sanjay Raut Shivsena Uddhav Thackeray Supreme Court

2023-02-21 901

एकीकडे सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होत असताना दुसरीकडे राज्यात मात्र राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या दोन दिवसांपासून दोन हजार कोटींच्या डीलबाबत दावा करून चर्चेची एकच खळबळ उडवून दिली आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पुन्हा या डील संदर्भात भाष्य केलं आहे. तसेच यावेळी बोलताना संजय राऊतांनी शिंदे गटाकडून ठाकरे गटातील आमदार-खासदार-पदाधिकाऱ्यांना खरेदी करण्यासाठी किती रुपये दिले जात होते, याचं रेटकार्ड तयार केल्याचा गंभीर दावा देखील केला.

#SanjayRaut #Shivsena #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #Justice #MarathiNews #Politics #BJP #BhagatSinghKoshyari #Maharashtra

Videos similaires