'रावण तुमच्या शेजारी बसला आहे. दररोज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेत असतो' अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 'सातत्याने बेताल वक्तव्य करत असल्याबद्दल संजय राऊत यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. विधिमंडळ कार्यालय हे कुणाच्या मालकीचं नसतं सरकारचं असतं. उद्धव ठाकरे यांच्या मालकीचं देखील नाही आहे. आम्ही कुणावरही मालकी सांगितली नाही, सांगणार नाही' अशी प्रतिक्रियाही केसरकर यांनी यावेळी दिली.