Buldhana: पक्षाचं नाव आणि चिन्ह परत मिळालं नाही तर... ठाकरे गटाचा इशारा

2023-02-20 0

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे चोरी गेल्याची तक्रार उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. आमचं चोरीला गेलेलं चिन्ह आणि नाव पोलिसांनी तपास करून परत आणून द्यावं, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव शिंदे गटाला मिळालं. त्यानंतर राज्यभरात ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Videos similaires