२१ फेब्रुवारीपासून राज्यात HSC Board बारावीची परीक्षा सुरू होणार आहे. यंदा ३ हजार १९५ मुख्य केंद्रांवर १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत काही महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. परिक्षेदरम्यान कॅापीचे प्रकार प्रभावीपणे रोखण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. पेपर फुटीचे प्रकारही रोखता यावेत यासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी सुरुवातीला दिली जाणारी वेळ आता मिळणार नाही. त्याऐवजी ही वेळ शेवटी वाढवून दिली जाईल, असं गोसावी यांनी सांगितलं.