'अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये'; Amit Shah यांच्या भेटीनंतर Girish Bapat यांच्या चिरंजीवांचे आवाहन
पुणे शहराचे खासदार गिरीश बापट हे मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घोले रोड येथील महात्मा फुले वस्तू संग्रहालय येथे जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीबाबत गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट म्हणाले की, 'अमित शाह आणि बाबांमध्ये सभागृहातील कामकाजाबाबत चांगली चर्चा झाली. या दोघांमधील चर्चा पाहून आम्हा कुटुंबीयांना खूप आनंद झाला' तसेच 'बाबांची तब्येत ठीक असून अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये' असे आवाहन देखील त्यांनी केले.
रिपोर्टर: सागर कासार