'संजय राऊत १५ मिनिटांचा पुढारी'; Shahajibapu यांची राऊतांवर टीका करत आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया

2023-02-17 1

'संजय राऊत १५ मिनिटांचा पुढारी'; Shahajibapu यांची राऊतांवर टीका करत आयोगाच्या निर्णयावर प्रतिक्रिया


'पांडुरंगाच्या पंढरपूर नगरीत आपण असतानाच शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्ही निवडणूक आयोगाकडून आपणास मिळाले याचा मोठा आनंद आहे. पांडुरंगाने आणि स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे यांना आशीर्वाद दिला. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक आनंदी आहे. खरी शिवसेना शिंदे यांचीच हे आज सत्य ठरलं' अशी प्रतिक्रिया सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी पंढरपुरात व्यक्त केली. संजय राऊत यांच्याकडून सातत्याने होणारी टीका म्हणजे 'सकाळचा पंधरा मिनिटांचा पुढारी आहे. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना कसं भडकवायचं असं कुटील कारस्थानी गुण जन्मजात राऊत यांच्याकडे आहेत' अशी बोचरी टीका यावेळी आमदार शहाजी बापू यांनी लगावली.

Videos similaires