राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमधील आवाज ठाणे पालिकेचे सहआयुक्त महेश आहेर यांचा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. या व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर आव्हाड यांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली जात आहे. मात्र अद्याप आम्हाला कोणताही सुरक्षा पुरवली नसल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड यांनी दिली आहे. त्या आज पत्रकार परिषदेत बोलत होत्या.