Ashish Shelar यांची पत्रकार परिषद; रोहित पवार, आदित्य ठाकरेंवर टीकेचे बाण
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती १९ फेब्रुवारीला (तारखेप्रमाणे) साजरी केली जाणार आहे. यानिमित्त भाजपाच्यावतीने मुंबईतील २२७ वार्डात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी काही राजकीय प्रश्न देखील विचारण्यात आले त्यावर आशिष शेलार यांनी उत्तर देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे