Chinchwad Bypoll: अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ Chandrashekhar Bawankule चिंचवडमध्ये
भाजपा उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ मॅरेथॉन बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे चिंचवड मध्ये आहेत. यावेळी त्यांनी एका सभेत बोलताना राष्ट्रवादी, काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मत म्हणजे विकास थांबवणे. दोन्ही पक्षांनी केवळ स्वतःसाठी मतांचं राजकारण केलं आहे. देशाच्या विकासाठी त्यांनी कधीच राजकारण केलं नाही, त्यांना विचारधारा नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.