राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देणारी एक तथाकथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर ठाणे महानगर पालिकेचे अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना पालिका मुख्यालय आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणानंतर महेश आहेर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपल्याला अनेकदा त्रास देण्याचा प्रयत्न झाला. मला व माझ्या कुटुंबीयांना आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांपासून धोका आहे, असा आरोप आहेर यांनी केला आहे.