Nashik: धावधा धावता बिबट्या, मांजर पडले विहिरीत; असा वाचला दोघांचा जीव

2023-02-16 2

सिन्नर तालुक्यातील टेंभूरवाडी येथे मांजरीला पकडण्याच्या नादात बिबट्या मांजरीसह विहिरीत पडल्याची घटना घडली. मात्र, पाण्यात पडल्यानंतर मांजरीने चक्क बिबट्याच्या शेपटीचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पाण्यात पडल्यानंतर बिबट्याने जीव वाचवण्यासाठी विद्युत मोटार ठेवण्यासाठी विहिरीत लावलेल्या लोखंडी अँगलचा आधार घेतला. नंतर वन विभागाच्या मदतीने दोघांनाही सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे.

Videos similaires