महाविकास आघाडीच्या संयुक्त मेळाव्यात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते राहुल कलाटेंवर सडकून टीका केली होती. त्यांना बंडखोर राहुल कलाटे यांनी उत्तर दिले असून चिंचवडची जनताच त्यांना मला विजयी करू उत्तर देईल.
अजित पवारांनी माझ्या पेक्षा जनतेच्या प्रश्नावर त्यांनी बोलायला हवे होते. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना उर्फ विठ्ठल काटे यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा संयुक्त मेळावा पार पडला. मेळाव्यात अजित पवार यांनी राहुल कलाटेंवर सडकून टीका केली होती. या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.