अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या मराठमोळ्या अंदाजासाठी नेहमीच ओळखली जाते. वेशभूषा असो नाहीतर खाद्यपदार्थ; तिला मराठी संस्कृतीबद्दल खूप प्रेम आहे. आता नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत ज्यात ती मिसळ आणि वडापावचा आस्वाद घेताना दिसतेय. दरम्यान तिचे पुणे दौऱ्यातील चांगलेच व्हिडीओ व्हायरल होत आहे.