उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तर फडणवीस यांनी शपथविधीबाबत केलेल्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलत असताना फडणवीसांवर पलटवार केला आहे. शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच सरकार चालले असते. सरकार 72 तासात कोसळले नसते असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
#SanjayRaut | #DevendraFadnavis | #sharadpawar | #maharashtra | #AjitPawar | #BJP | #NCP | #NWNewsMarathi