Turkey earthquake: ज्युली-रोमियोमुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश

2023-02-13 2

भूकंपग्रस्त टर्कीमध्ये अद्यापही बचाव कार्य सुरू आहे. ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताने भूकंपग्रस्त टर्की, सीरिया येथे NDRFची टीम पाठवली आहे. एनडीआरएफची टीम ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच श्वान पथकातील ज्युली आणि रोमियो यांच्यामुळे एका लहान मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. या दोन श्वानांच्या मदतीने नर्दगी परिसरात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आलं आहे. सध्या या दोन्ही श्वानांचा कौतुक होत आहे.

Videos similaires