Ajit Pawar on Chinchwad: 'आपल्याला बदला घ्यायचा आहे'; नाना काटेंच्या प्रचारसभेतून पवारांचे आवाहन

2023-02-13 0

Ajit Pawar on Chinchwad: 'आपल्याला बदला घ्यायचा आहे'; नाना काटेंच्या प्रचारसभेतून पवारांचे आवाहन

मागील काही दिवसांपासून राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. विधान परिषदेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता विधानसभेच्या चिंचवड आणि कसबा पेट या जागांच्या पोटनिवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे.आज (१३ फेब्रुवारी) रोजी अजित पवार यांनी चिंचवड येथे जाहीर सभेला संबोधित केले. या सभेत त्यांनी आपल्याला चिंचवड, कसबा पेट ही निवडणूक जिंकायची आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावे लागले, त्याचा आपल्याला बदला घ्यायचा आहे, अशी भावनिक साद घातली.