कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्ष तथा महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील सभेला उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्ते व्यासपीठावर काळे फुगे आणि त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा फोटो लावून आले होते. ते फुगे अजित पवार यांना कार्यकर्त्यांनी सोडण्याची विनंती केली. त्यावर अजित पवार यांनी नेमकं काय केलं पाहा.
प्रतिनिधी - सागर कासार