Narayan Rane on Warishe: 'वारिशे यांना मी कधी भेटलेलो नाही'; नारायण राणेंचं पत्रकारपरिषदेत विधान!
भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. पत्रकार शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काही गंभीर आरोप व विधानं केली आहेत. शिवाय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही पाठवलं आहे. यावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.